प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो
पुणे – रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना कोव्हिड-19 ची लागण देखिल झाली आहे.

कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक असा रोबोट बनवला आहे, जो स्वतःहून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करू शकतो. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष देखील ठेवू शकतो.
मध्य रेल्वेने तयार केलेल्या या रोबोटचे नाव ‘कॅप्टन अर्जुन’ असे ठेवण्यात आले आहे. पुणे स्थानकात शुक्रवारी या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले.

आर.पी.एफचे महासंचालक अरुण कुमार यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे उद्घाटन केले.यावेळी पुणे स्थानकात मध्य रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त आलो बोहरा असे अनेक अधिकारी उपस्थित होते