प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय

0
379

प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय

ग्लोबल न्यूज: प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रसिद्ध  जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचा नावाने दिला जाणारा ‘रिचर्ड डॉकिन्स’ हा पुरस्कार प्रसिद्ध भारतीय लेखक जावेद अख्तर यांना जाहीर झाला असून, ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुशल तसेच मानवी प्रगती व मानवतावादी मूल्ये उन्नत करणाऱ्या विचारसरनीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर वरून याबाबत माहिती दिली आहे.

बॉलीवूड कलाकार अनिल कपूर, दिया मिर्झा यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांनी सलीम खान यांच्या सोबत शोले, जंजीर, दिवार यासारख्या प्रसिद्ध सिनेमांचे लेखन केले आहे.

भारत सरकार कडून  त्यांना १९९९ मध्ये पदमश्री तर २००७ मध्ये पदमभूषण देण्यात आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur