पोलीस आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर; बार्शी करांनो काळजी घ्या बाहेर फिरू नका-डीवायएसपी -सिद्धेश्वर भोरे

0
99

गणेश भोळे

बार्शी शहरातील सर्व सुजाण नागरिकांना विंनती करण्यात येते की ,सध्या कोरोना विषाणू थैमान घालत आहे याची साखळी तोडणे गरजेचे आहे.या साठी शासन पूर्ण प्रयत्नशील आहे.आज शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे.हे केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आपल्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कर्मचारी रस्त्यावर आहेत .

हुल्लडबाजी करून कायदेशीर प्रक्रीयेला सामोरे जाण्या ऐवजी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.

चला तर ,, सर्वजण मिळून प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करू आणि आपलं अनमोल सहकार्य आपण घराबाहेर न निघणे यापेक्षा दुसरं कोणतं असू शकत नाही.
नागरीकानी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि आपली जबाबदारी पार पाडावी.
🙏
सिद्धेश्वर भोरे
उप विभागीय पोलीस अधिकारी
अधिकारी बार्शी
🙏🙏