पोलिस कर्मचाऱ्याना मारहाण केल्याप्रकरणी आठजणांविरुध्द बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

0
67

पोलिस कर्मचाऱ्याना मारहाण केल्याप्रकरणी आठजणांविरुध्द बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

बार्शी : गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरानाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केलेली असताना जमावाने थांबलेल्यांना जाण्यास सांगितल्यानंतर संबंधितांनी पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गाडेगांव रोड ४२२ भागातील आठ जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २७ रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास ४२२ गाडेगांव चौकात सदरचा प्रकार घडला.

शाहिद अजीज पठाण, मियाँ पठाण, मोहसीन बाबु पठाण, समीर शेख, अमीर शेख, जावेद अजीज पठाण, अमर गजघाटे, फय्याज शेख, सर्व रा. ४२२ चौक गाडेगांव रोड बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शेलार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

 दरम्यान, पोलीसांनी यातील मोहसीन पठाण, जावेद पठाण, शाहिद पठाण या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शेलार हे महाराष्ट्र कमांडो फोर्सचे आकाश पांडव व सचिन लोंढे यांच्यासह कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत पालिकेच्या टमटम वाहनातून अनाऊसिंग करून जनजागृती करत होते. ते गाडेगांव रोडवरील ४२२ चौकात आल्यानंतर त्यांना चौकात १० ते १२ लोक जमा झालेले दिसले. त्यावेळी शेलार व त्यांच्यासमवेत असलेल्या दोघांनी त्यांना तेथून निघून जाणेबाबत सांगितले असताना कांही लोक निघून गेले. परंतु त्यातील ७ ते ८ लोक धावून त्यांच्या अंगावर गेले. टमटममधील दोन जवान पांडव व लोंढे यांना खाली ओढून तुम्ही कोण आम्हाला सांगणार, कोरोना आमचे काय वाकडं करतोय ते बघू असे म्हणून त्यांचेच हातातील फायबर काठीने मारहाण केली.

त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शेलार सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही संबंधितांनी मारहाण केली. त्यातील एकाने टमटमचा आरसा फोडला. त्यानंतर शेलार यांनी पोलीस ठाण्यास फोन करून अधिक मदत मागवून घेतल्यानंतर गाडी दिसल्यानंतर संशयित तेथून पळून जावू लागले. त्यावेळी शेलार यांनी शाहीद अजिज पठाण यास धरून ठेवले. पोलीसांनी इतर मारहाण करणारांची नावे त्याला विचारल्यानंतर त्यांने इतर संशयितांची नावे सांगितली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे करत आहेत.