पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार – उदय सामंत

0
128

पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार – उदय सामंत
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशात 3 मे पर्यंत
लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या दोन तीन दिवसात त्याचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालय यांच्या परीक्षेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील अनेक विध्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. युजीसीनर नेमलेल्या 2 समितींने याबाबत काही शिफारसी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या गाईडलाइन्स या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत अशी माहिती सुद्धा मंत्री महोदयांनी दिली आहे. त्याप्रमाणे एफवाय आणि एसवायच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेण्यात याव्यात. शिवाय 12 वी निकाल लागल्यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन 1 सप्टेंबर पर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू कराव्यात, अशा सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता उद्या आणि परवा तंत्र शिक्षण विभागाचे संचालक आणि राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू या गाईडलाइन्स नुसार राज्यातील विद्यापीठासाठीचे अंतिम वेळापत्रक 2 ते 3 दिवसात ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितले. हे वेळापत्रक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे मंत्री उया सामंत यांनी म्हणाले आहेत.