नेहमीपेक्षा पाच दिवस आधीच मॉन्सून अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल

0
221

नेहमीपेक्षा पाच दिवस आधीच मॉन्सून अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल

पुणे – उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांसाठी एक सुखद बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थाच मान्सून नेहमीपेक्षा पाच दिवस आधीच म्हणजे काल (रविवारी) अंदमानचा समुद्र व  निकोबार बेटांपर्यंत येऊन धडकला असल्याचे दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला सध्या पोषक स्थिती असल्याने पुढील 24 तासांत त्याची आणखी प्रगती होण्याचा अंदाज आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अंदमानमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन नियोजित वेळेत किंवा त्यापूर्वी झाल्यास आणि त्यात कोणताही अडथळा न आल्यास त्यांची देशातील वाटचाल योग्य पद्धतीने होऊ शकते.

मॉन्सूनचे अंदमानातील आगमन १६ मेनंतर होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.त्यानुसार १७ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत दाखल झाला आहे. या भागात सध्या ढगांची दाटी झाली असून, पुढील चार ते पाच दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये अंदमान समुद्र आणि बेटे, निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागरातील बहुतांश भाग तो व्यापणार आहे. गतवर्षी नेहमीपेक्षा चार दिवस आधी मोसमी वारे अंदमानात दाखल होऊनही विविध अडथळ्यांमुळे त्यांची वाटचाल मंदावली होती.

अंदमान बेटे ओलांडून पुढे येण्यास मॉन्सूनला तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला होता. ३० मेनंतर मॉन्सून अंदमानातून केरळच्या दिशेने पुढे सरकला होता. मॉन्सून केरळमार्गे भारतात पोहोचण्याचा सर्वसाधारण दिवस एक जून असला, तरी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार ही तारीख पुढे-मागे होत असते.
‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांना गती

बंगालच्या उपसागरात सध्या ‘अ‍ॅम्फन’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याच भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू आहे. सध्या हे चक्रीवादळ मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी चालना देत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ४० तासांत या चक्रीवादळाचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होणार आहे.

त्यामुळे ताशी १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सध्या ताशी पाच किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकणारे हे चक्रीवादळ आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur