“निसर्ग चक्रीवादळ ” पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी वाचा ..!

0
159

“निसर्ग चक्रीवादळ ” पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी वाचा ..!

कोरोना पाठोपाठ राज्यातील काही जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळाने मोठया प्रमाणात आर्थिकहानी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका आता रायगड जिल्ह्याला बसला आहे. यात लोकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेत झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या वादळाचा पंचनामा झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून याची सविस्तर माहिती देईन. तसेच त्यांच्याबरोबर याविषयी सविस्तर चर्चा करून लोकांची नुकसान भरपाई कश्या पद्धतीने देता येईल, हे पाहणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून नुकसानीची माहिती घेतली आहे.