धोका वाढतच आहे: चोवीस तासात सोलापूर शहरात 91 तर जिल्ह्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले1
सोलापूर – सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1401 इतकी झाली असून मृतांची संख्या 123 आहे. सद्यस्थितीत सोलापूरात 506 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर 772 जण कोरोनामुक्त झाले आहेत.आज शहरातील 176 अहवाल प्राप्त झाले यात 86 निगेटिव्ह तर 91 पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये 62 पुरूष आणि 29 महिलांचा समावेश आहे.

आज 1 महिला मृत पावल्याची नोंद आहे. आज एकूण 13 जण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.
आज मृत झालेली महिला शिवगंगा नगर कमल हॉल परिसरातील 85 वर्षीय आहे.

सोलापूर ग्रामीण मधील कोरोनाबाधितांची संख्या 103 इतकी झाली आहे तर मृतांची संख्या 6 आहे. ग्रामीणमध्ये आज 37 अहवाल प्राप्त झाले यात 34 निगेटिव्ह तर 3 पॉझिटिव्ह अहवाल आलेत त्यात 1 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
आज एकही मृत नाही. सध्या ग्रामीणमध्ये 64 बाधितांवर उपचार सुरू आहेत तर 33 जण बरे होवून घरी परतले आहेत.
आज जे रूग्ण मिळाले त्यात समर्थ नगर अक्कलकोट 1 महिला. मौेलाली गल्ली अक्कलकोट 1 महिला. गुळवे नगर अकलूज 1 पुरूष यांचा समावेश आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1504 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 129 इतकी आहे.आत्तापर्यंत जिल्ह्यात 805 रूग्ण बरे होवून घरी परतले तर 570 जणांवर उपचार सुरू आहेत.