धक्कादायक; सोलापुरात कोरोनाचे नवीन १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले-जिल्हाधिकारी

0
22

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.  एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे.  हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे. 

कोरोनाचा सोलापुरात प्रवेश झाला असून त्यात पाच्छा पेठ येथील मृत किराणा दुकानदाराचा समावेश आहे. तर एका महिलेवर उपचार सुरू आहेत.या महिलेच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. या सर्वांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी सायंकाळी दिली होती ते अहवाल गुरुवारी दुपारी मिळणार होते.त्यामुळे अनेक शहर आणि जिल्हा परिसरातील सोलापूरकरांच्या मनात टेन्शन निर्माण झाले होते.सोलापूर शहरात आणखीन दहा कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.ही महिला पूर्व भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका व्यक्तीला काेरोनाची लागण झाली आहे.  सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.