धक्कादायक: राज्यात ५०० डॉक्टरांना कोरोना, मुंबईत संख्या जास्त….!

0
293

राज्यात ५०० डॉक्टरांना कोरोना, मुंबईत संख्या जास्त….!

राज्यात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यात काही अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. मात्र आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यात रुग्णाची सेवा बजावणाऱ्या 500 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे यात सायन रुग्णालयात डॉक्टरांना लागण झाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

इंडियन एक्स्प्रेसने आयएमएच्या सदस्यानं दिलेल्या माहितीवरून हे वृत्त दिले आहे. सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांची संख्या जास्त असून, मुंबईतील सायन रुग्णालयात करोना झालेल्या डॉक्टरांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे, असं अहवालात म्हटलं आहे. राज्यात करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोना व लॉकडाउनच्या काळात सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

त्यात राज्यात ५०० पेक्षा अधिक डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. करोनाचं निदान झालेल्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अधिक असून, मुंबईतील सायन रुग्णालयात सर्वाधिक ७० डॉक्टर करोना बाधित झाले आहेत. तर परळ केईएममध्ये ४०, तर नायर रुग्णालयात ३५ डॉक्टरांना संसर्ग झालेला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur