धक्कादायक: राज्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 हजाराच्या पुढे रविवारी आढळले तब्बल 3041 रुग्ण

0
141

ग्लोबल न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण संख्येने आज (रविवारी) 50 हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत राज्यातील एकूण 50 हजार 231 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे. आज 3041 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1196 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 14 हजार 600 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात आज 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या 1635 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 39, पुण्यात 6, सोलापुरात 6, औरंगाबाद शहरात 4,लातूरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 1, ठाणे शहरात 1 मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 30,542 (988)
ठाणे मंडळ एकूण: 38,585 (1110)
नाशिक मंडळ एकूण: 1,570 (103)
पुणे मंडळ एकूण: 6562 (309)
कोल्हापूर मंडळ एकूण: 504 (5)
औरंगाबाद मंडळ एकूण: 1446 (47)
लातूर मंडळ एकूण: 226 (8)
अकोला मंडळ एकूण: 733 (34)
नागपूर मंडळ एकूण: 556 (8)
इतर राज्ये: 49 (11)
एकूण: 50 हजार 231 (1,635)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2,283 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 913 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 66.60 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.