धक्कादायक ! बार्शीत आणखी एका तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
बार्शी – तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही.मागील एक महिन्यात शहरात विविध कारणांनी सहा जणांनी आत्महत्या केली आहे.शहरातील पाटील प्लॉट येथील मंगेश अशोक भाकरे या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ते 37 वर्षांचे होते.


मंगेशने 1 दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट लिहली होती. त्यामध्ये, ‘कळत नकळत काही चूक झाली असेल तर, माफ करा’ असा भावनिक संदेश लिहिला होता. त्यांनतर, रात्री मंगेशने हे टोकाचे पाऊल उचलले.मंगेशचे वडील अशोक भाकरे हे वकील होते. मागील पंधरा वर्षांपूर्वी त्याचा मृतदेह शेतातील ओढ्यात आढळला होता.

तर आईच कॅन्सर ने निधन झालं होतं.मंगेश यांचा औषधे विक्रीचा होलसेल व्यवसाय होता. तो ही आता बंद केला होता. त्याला दारूचे व्यसन होते. या दारूने घात करून अखेर त्याचा बळी घेतला. या घटनेनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, तरुणाईसाठी प्रबोधनाची गरज व्यक्त करण्यात येत आहे.