देशात कोरोना रुग्णांची संख्या 148 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

  0
  24

  नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी सकाळी संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 148 झाली आहे. यामधील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमित लोकांमध्ये 24 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकार तीन स्तरावर काम करत आहे. जास्तीत जास्त प्रदेशांमधील शाळा-कॉलेज, ऑफिस आणि पर्यटन स्थळ बंद आहेत.

  कोरोनाचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त आहे. येथे 42 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यासोबतच आंध्रप्रदेशमध्ये एक, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, पंजाबमध्ये एक, राजस्थानमध्ये 4, तामिळनाडूमध्ये एक, तेलंगानामध्ये 5, जम्मू-कश्मीर मध्ये 3, लद्दाखमध्ये 8, उत्तर प्रदेशमध्ये 16, उत्तराखंडमध्ये एक, ओडिशामध्ये एक आणि पश्चिम बंगालमध्ये एक प्रकरण समोर आले आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  कोरोेना व्हायरसचा कहर पाहता सर्वच मंदिर आता बंद करण्यात आली आहे. गर्दीमुळे हा आजार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आता महत्त्वाची सर्वच मंदिर बंद करण्यात आली आहे. महारष्ट्रातीलही कोल्हापूर मंदिर, शिर्डी, सिद्धिविनायक अशी सर्वच महत्त्वाची धार्मिक ठिकाणे, गावाकडील यात्रा हे सर्व बंद करण्यात आली आहे.

  तर उत्तर आणि दक्षित क्षारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्येही भाविकांना दर्शनासा मनाई करण्यात येत आहे. यूपीमध्येही योगी सरकार कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. काशी विश्वनाथ मंदिरापासून बुद्ध मंदिरापर्यंतच्या प्रदेशामध्ये अनेक धार्मिक स्थळ बंद करण्यात आली आहेत.