देशभरात आजपासून अटींसह दुकानं उघडण्याची सूट, पाहा कोणती दुकानं सुरु, कोणती बंद!

0
87

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं आहे की, महानगरपालिका क्षेत्राबाहेरील भागातील बाजारपेठ परिसरातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या दुकानांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी काम करतील आणि मास्क वापरण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल. पण ही सूट मल्टी आणि सिंगल ब्रँड मॉल असणारी दुकानांना देण्यात आलेली नाही. 


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

केंद्रीय गृह सचिवांनी एका आदेशात म्हटले आहे की, महानगरपालिका आणि त्या आसपासच्या कार्यक्षेत्रात असलेल्या काही दुकानं आता सुरू ठेवता येणार आहेत.मात्र, नगरपालिका हद्दीतील दुकाने ही ३ मेपर्यंत बंदच राहतील. संसर्ग झालेल्या सर्वात प्रभावित भागांमध्ये ही सूट देण्यात आलेली नाही.


या दुकानांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारीचं असणं बंधनकारक आहे. यासह, त्यांना सोशल डिस्टन्सिंग नियमांचे देखील पालन करावे लागेल आणि त्याच वेळी, दुकानात काम करणाऱ्यांना मास्क देखील लावावे लागतील.

पाहा आजपासून कोणकोणती दुकाने सुरु राहणार  यावर एक नजर टाका-

संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने, महापालिका व नगरपालिकांच्या बाहेरील निवासी परिसर तसेच बाजार आवारातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.

शहरी भागात, अनावश्यक वस्तू आणि सेवा चालवण्यास परवानगी देण्यात येईल, पण जर ती दुकाने अनिवासी भागात असतील तरच.

ग्रामीण भागात अनावश्यक सेवा सर्व प्रकारच्या दुकानात विकल्या जाऊ शकतात.

महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या बाहेरील नोंदणीकृत बाजारपेठांमध्ये असलेली दुकाने केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.

स्थानिक सलून आणि पार्लर शनिवारपासून सुरु करण्याची परवानगी दिली जाईल.

ग्रामीण आणि निम-ग्रामीण भागात सर्व बाजार उघडण्यास परवानगी आहे

काय-काय असणार बंद? यावर एक नजरही-

शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप उघडणार नाहीत

कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही

महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील  मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने  उघडणार नाहीत.

सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल बंद राहील.

कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही, लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आहे.