दीनानाथ काटकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल

0
1434

बार्शी : जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील दिनानाथ माणिक काटकर याच्याविरोधात पांगरी पोलीसांत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक )अधि. (अट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मिठू आबा झोंबाडे वय ६५ रा. घारी ता. बार्शी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी सदरची घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

झोंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० नोव्हेंबर २०११ रोजी दिनानाथ माणिक काटकर याचेकडून दीड लाख हातउसने घेतले होते. त्याचे बदल्यात आम्ही त्यास शेती गट नंबर ३६९ मधील २ एकर शेती व दि. १ ऑक्टोबर २०१२ रोजी १ एकर शेतीचे ८० हजार अशी दोन्ही मिळून ३ एकर क्षेत्र त्यांनी २ लाख ३० हजार रूपयाला माझे व मुलगा भागवत झोंबाडे असे दोघाकडून हातउसने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात शेतीचे खरेदीखत लिहून घेतले होते. हातउसने दिलेले पैसे परत दिल्यास तो आम्हास आमची शेती परत देणार होता, असे तोंडी ठरले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्याचेकडून हात उसने घेतलेले पैसे व्याजामुद्दलासहित आम्ही दिनानाथ काटकर यास बार्शी येथे रायचूरकर वाडा येथे जावून त्यास एकूण ३ लाख ५० हजार असे व्याजामुद्दलासहित त्यास परत केले. परंतु सदर इसमाने आमची शेती आम्हास परत दिली नाही. त्यामुळे मी वेगवेगळया कार्यालयात तक्रारी अर्ज केले होते. त्यानंतर दिनानाथ काटकर यांना मी व मुलगा भागवत असे दोघेजण मिळून दि. २९ सप्टेंबर २० रोजी सायंकाळी थोडा अंधार असताना आम्ही बार्शी येथील भगवंत मैदानात त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी तो तेथे एकटाच आला.

त्यावेळी सदर ठिकाणी आम्हा तिघाव्यतिरिक्त तेथे कोण नव्हते, त्यावेळी मी त्यास म्हणालो की, माझी शेती मला परत करा. मी तुमचे सर्व पैसे व्याजासहित परत दिले आहेत असे म्हणताच काटकर मला व मुलाला म्हणाला की, परत तुम्ही बार्शी येथे यायचे नाही. नाहीतर मी तुम्हाला पोलीस केस करून आत टाकेल. मी माहिती अधिकारी आहे. मला सर्व कायदा माहित असल्यामुळे मला सर्वजण घाबरतात. परत तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला मारहाण करून जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी देवून आम्हास म्हणाला की, मी एक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. माझी इज्जत तुम्ही घालवतात काय असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली अशा आशयाची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here