दिलासादायक बातमी – उस्मानाबाद जिल्ह्यातील गुरुवारचे सर्व 31 अहवाल निगेटिव्ह ; ४४ जणांवर उपचार सुरू
आज दि 11जुन रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातुन 31 स्वँब तपासणीसाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहेत त्याचे अहवाल प्राप्त झाले असून 28 अहवाल निगेटिव्ह 2 Inconclusive व 1 Rejected आहे . अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची दिली आहे. त्यामुळे आज उस्मानाबाद जिल्हा साठी मोठी ही दिलासादायक बातमी आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण – 137

एकूण बरे झालेले रुग्ण – 90
उपचार घेत असलेले रुग्ण – 44
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण – 3
आज पर्यंत जिल्ह्यात सापडलेल्या कोरणा रुग्णांची संख्या तालुका संख्या प्रमाणे
उस्मानाबाद तालुका – 56
कळंब तालुका- 33
उमरगा तालुका – 16
परंडा तालुका- 11
लोहारा- तालुका- 8
वाशी तालुका- 4
तुळजापूर तालुका- 7
भूम तालुका- 3