दिलासादायक: पुणे विभागात कोरोनामुक्तांचे प्रमाण 63.90 टक्के

0
49

ग्लोबल न्यूज – पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. त्यातील 10 हजार 156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 5 हजार 21 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवाडीनुसार, पुणे विभागामध्ये एकुण 1 लाख 21 हजार 4 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यापैकी 1 लाख 17 हजार 379 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 625 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 1 हजार 228 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 893 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कालच्या (सोमवार, दि. 15) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत आज (मंगळवारी ) पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 330 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 242, सातारा जिल्ह्यात 7, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील 12 हजार 389 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 952 आहे.

कोरोनाबाधित एकूण 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील 745 कोरोना बाधीत रुग्ण असून 537 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 174 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील 1 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण असून 942 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 693 आहे. कोरोना बाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 119 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 725 रुग्ण असून 634 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 83 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here