त्या ५० मराठी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर, करणार अशी व्यवस्था

  0
  24

  मुंबई  :  सिंगापूरमध्ये अडकलेल्या ५० विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहे.  त्यामुळे आता या ५० विद्यार्थ्यांची काळजी सिंगापूर येथील भारतीय दूतावास काळजी घेणार असल्याचे आहे.  या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ५० विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी तन्वी बोडस हिच्याशी मुख्यमंत्र्यांनी बोलून  धीर दिला. 

  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  सामंत म्हणाले, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क  सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल.

  सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवर संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला.

  सिंगापूरमध्ये अडकलेल्या ५० विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहे.