तबलिगी जमातवर बंदी घाला, लेखिका तस्लिमा नसरीन यांची मागणी

0
69

तबलिगी जमातमुळे मुस्लिम समाजाचे नुकसान झाले आहे, अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी लेखिका तस्लिमा नसरीज यांनी केली आहे. तसेच तबलिगी जमात मुस्लिमांना 1400 वर्ष मागे घेऊन जाईल असेही त्या म्हणाल्या.

नसरीन म्हणाल्या की माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. परंतु माणुसकीसाठी काही गोष्टींवर बंदी घातली पाहिजे. तबलिगी जमात मुस्लिमांना 1400 वर्ष जुना अरब काळात नेऊ इच्छिते. मुस्लिमांना शिक्षित, प्रगतीशील आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा आम्ही विचार करतो आहोत. परंतु तबलिगी समाज अज्ञान पसरवत असून लाखो लोकांना अंधारात घेऊन जात आहे असे नसरीन म्हणाल्या.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या तबलिगी स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या जिवालाही धोका निर्माण करत असल्याचे नसरीन म्हणाल्या. तसेच जेव्हा एखाद्या व्हायरसमुळे माणुसकी धोक्यात आली असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे असेही नसरीन म्हणाल्या.