डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आ.राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक पोस्ट

0
68

उस्मानाबाद दि.१ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचा आज वाढदिवस.महाराष्ट्राच्या राजकारणात डॉ.पद्मसिंह पाटील यांनी जवळपास वीस वर्ष वर्चस्व गाजवले.उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांनी 1978 पासून सातत्याने जिल्ह्यातील बहुतेक सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात ठेवली. व नंतरच्या काळात  काही काळचा अपवाद वगळता त्यांचे पुत्र आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील ती परंपरा कायम ठेवली.

   डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जलसिंचन व विद्युत विभागातील जी कामे केली त्या कामाचं फलित म्हणूनच उस्मानाबाद जिल्ह्यात आज जवळपास 17 ते 18 साखर कारखाने आहेत. आज त्यांनी वयाची 80  वर्षे पूर्ण केलेली आहे. तरी आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासात जी बोटावर मोजण्याइतपत नावे अजरामर राहतील त्यात डॉ.पद्मसिंह पाटील यांचे नाव अग्रस्थानी असेल हे मात्र नक्की.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उस्मानाबाद जिल्ह्याच्या नेत्याचा राज्याच्या राजकारणात त्यांच्या एवढा दबदबा यापूर्वी कोणाचाही नव्हता,पुढे राहील की नाही हे सांगता येत नाही. आजही ते व्यायामाला प्राधान्य देताना दिसून येतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर आहे यामध्ये ते नेमके काय म्हणतात हे ही वाचा.

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या शब्दात


तुम्ही आमचे सर्वात मोठे आशास्थान.. तुम्ही सर्वात मोठा आधारस्तंभ..तुम्ही प्रेरणास्थान.. तुम्ही दूरदर्शी मार्गदर्शक.. तुम्हीच गुरु..तुम्ही मला जीवन तर दिलेच पण मला एका निश्चित ध्येयाने घडविलेत.. माझ्यामध्ये एक प्रेष जागविलात..

लोकसेवा हेच जीवितकार्य असले पाहिजे.. त्यासाठी अविरत कष्ट करण्याची तयारी पाहिजे.. त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची मानसिकता हवी.. या शिकवणुकीने लोककेंद्रित निस्वार्थ कार्य करण्याची भूमिका आपण तयार केली.. लोकसेवेत खरे समाधान असते हे आपल्या संस्कारांनी कळाले.

आपण सारे काही दिले, आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपणास कृतज्ञतापूर्वक काय देऊ शकतो ? आपल्याला आनंद देईल अशी एक गोष्ट आम्ही नक्कीच देऊ शकतो.. एक वचन..

आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण दिलेल्या संस्कारांनी लोककेंद्रित कार्याला अर्पण करण्याचे वचन हेच आपणास सर्वाधिक आनंद देऊ शकेल. आज कृतज्ञतापूर्वक आपले लोकसेवेचे व्रत अविरत पुढे चालविण्याचे वचन देतो.
आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद असाच कायम असू द्यावा.

आपणास दीर्घायु लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

लोकनायक@८० [email protected]