डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची तहसीलदार ऋषीकेत शेळकेंना मारहाण

0
26

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची तहसीलदारांना मारहाण

सांगली – आमच्या वाळूच्या डंपरवर दंड का केला? या कारणावरुन खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मारहाण करण्याची घटना आज (रविवारी) दुपारी घडली. मारहाण केल्यानंतर चंद्रहार पाटील आणि त्यांचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देताना ऋषिकेत शेळके म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी विटा येथील तहसिल कार्यालयातील काम उरकून बाहेर पडत असताना, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व त्यांचे सहकारी आमच्यावर वाळूचा इतका दंड का केला, असा जाब विचारू लागले. त्यानंतर मी त्यांना कायदेशिर अपिल करण्याचा सल्ला दिला.

मी केलेला दंड मी स्वत: कमी करु शकत नाही, असे त्यांना सांगून मी गाडीमध्ये बसत असताना मला बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. व ते सर्व जण पळून गेले.

याप्रकरणी तहसिलदार ऋषिकेश शेळके यांनी चंद्रहार पाटील व त्यांच्या अनोळखी सहकाऱ्यावर विटा पोलिसात तक्रार दिली आहे.विटा पोलिसात चंद्रहार पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती. त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचाही समावेश होता.