जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आकडा वाढण्याची शक्यता
ग्लोबल न्यूज: सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्नांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही खाई अंशतः वाढलेले दिसून येत आहे. आज दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे.याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णावाढी संख्ये बाबत आरोग्यमंत्र्यांनी नवा अंदाज व्यक्त केला आहे.


जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाग्रस्थांची संख्या वाढेल, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाढण्याची भीती नाही, पण मृत्यूदर वाढू नये,हा आमचा प्रयत्न असणार आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे. मुंबईतली रुग्णसंख्या कमी होईल, पण मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे तिथे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे