जिल्हाधिकारी यांच्या सुधारित नियमावलीचे उल्लंघन बार्शीतील व्ही के मार्ट सह दोघांवर गुन्हा दाखल

0
110

बार्शी :  जिल्हाधिकारी यांच्या सुधारित नियमावलीचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार्शीतील व्ही के मार्ट आणि ऋषभ सेल्स या दोन मॉल विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की दि ३ मे नतंर १७ मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉक डाऊन बाबतीत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार सुधारित नियमावली प्रमाणे दि ४ मे पासून  दूध विक्री साठी सकाळी ६ ते  १० ,अंडे मटण ,मासे सकाळी ६ ते १२ आणि किराणा ,भाजीपाला, बेकरी साठी सकाळी ६ ते १० अशी सुधारित वेळ देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मात्र आज भवानी पेठेतील व्ही के मार्ट  आणि सोमवार पेठेतील ऋषभ सेल्स ही दुकाने मर्यादित वेळेनंतर सुरू असल्याचे दिसून आले तसेच मॉल मधील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरवता हायगयीने व  बेदरराकपणे मानवी जीवित व व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य केल्या प्रकरणी व्ही के मार्ट चे मालक महेश गुडे,नितीन सोपल,योगेश जोशी, गिरीश झंवर,आणि कमलेश मेहता आणि ऋषभ सेल्स चे शैलेश शरद वखरिया रा सर्वजण बार्शी यांचे विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस करत आहेत या कारवाई ने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.