जागतिक आरोग्य संघटनेचं कोरोनावर खळबळजनक भाकीत

0
272

जागतिक आरोग्य संघटनेचं कोरोनावर खळबळजनक भाकीत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: कोरोनासारख्या महामारीचा दुसरा सर्वोच्च टप्पा येणं आणखी बाकी आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मायकल रियान यांनी हे वक्तव्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या इशाऱ्याने जगभरात खळबळ माजली आहे.

ज्या देशांनी कोरोनावर मात केली आहे तसंच लॉकडाऊन उठवला आहे किंवा शिथील केला आहे अशा देशांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. एकप्रकारे नियोजन नसताना लॉकडाऊन उठवणं योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

एप्रिल मे मध्ये कोरोनाचा पहिला पिक आल्यानंतर आणि जसजसा तो शांत होतोय, असं लक्षात आल्यानंतर बऱ्याचश्या देशांनी निर्बंध उठवायला सुरूवात केली. मात्र लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

दरम्यान, जूनच्या शेवटाला कोरोनाह व्हायरसची दुसरी लाट येईल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्ह केसेस सापडतील, असं भाकित जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur