चीनच्या नागरिकांना मुंबईच्या हॉटेलमध्ये नो-एन्ट्री ?
भारत आणि चीन देशात वाढता तणाव लक्षात घेता सध्या भारतात चीनच्या वस्तूवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेला अनेक व्यापारी वर्गाने सुद्धा सहकार्य करत चीनच्या वस्तू न विकण्याचे एकमताने ठरविले आहे. या निर्णयाचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल व्यवसावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


येत्या काळात चिनी नागरिकांना मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये एन्ट्री न देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी हॉटेल व्यव्यसायीकांनी चिनी वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सिमेवर चीन आणि भारतीय सैन्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉन्फरडेशन ऑल ऑफ इंडिया ट्रेडच्या वतीने एक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमे अनंतर्गत चीनच्या नागरिकांना हॉटेल आणि लॉजमध्ये एन्ट्री न देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

दरम्यान, या मोहिमेसंदर्भात बोलताना कॉन्फरेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडसचे अध्यक्ष बिसी भरतीया म्हणाले की, सध्या हिंदुस्थानात कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय उड्डाण होत नाहीत. पण भविष्यात उड्डाणे सुरु झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात चिनी मुंबई, पुणे, आग्रा आणि बंगळरु या शहरांमध्ये येतात. सध्या आम्ही या सर्व शहरातील हॉटेल व्यावसायिकांची चर्चा करीत असून त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही त्यांना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.