चंद्रकांत पाटलांनी साधला शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा….!
आधी कोरोना आणि आता निसर्ग चक्रीवादळाच्या विषयावर मागविकास आघाडी आणि विरोधी पक्षात चांगलेच शब्दीक युद्ध पाहायला मिळत आहे. भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं. त्याअगोदर ते घरात बसून होते. त्यावेळी त्यांना घराच्या बाहेर पडावंसं वाटलं नाही, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.


निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घरांची, शेतीची पाहणी करण्यासाठी पहिल्यांदा भाजप नेते पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला आणि आता शरद पवार करायला निघाले आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि पवारांना लक्ष्य करत सडकून टीका केली.
कालपासून कोकणाशी संबंधित भाजपचे सर्व आमदार काम करत आहेत. ते रत्नागिरी, रायगड या भागात प्रवास करत आहेत. केवळ प्रवास करुन आम्ही थांबलो नाही, तर आज 16 ट्रक साहित्य कोकणात पाठवले आहे. यात पत्रे ताडपत्री यांचा समावेश आहे. तेथील सर्व छपरं उडाली आहेत, असं सांगत या सरकारला नुकसानीचा अंदाज आला नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.