बार्शी :बार्शी ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गोपाळ सुरवसे, उपाध्यक्ष दर्शन मंडलिक ,कार्याध्यक्ष महेश माने , सचिवपदी रामेश्वर चौरे बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले .

ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक झाली.यात या निवडी करण्यात आल्या.यावेळी ग्रामसेवक दैनंदिनीचे सभापती अनिल डिसले,माजी सभापती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ ,कार्याध्यक्ष तात्या ढवळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी माजी तालुकाध्यक्ष अंकुश काटे, नितीन वाघमारे ,अनिल बारस्कर , मुकुंद जगदाळे, खमर सय्यद ,रामेश्वर भोसले ,किरण वाघमारे, राम गुंडेवार, गोपाळ घुगे, समाधान घुगे, वाजिद पठाण, तानाजी अंधारे महिला उपाध्यक्ष मेघा पाटील, अर्चना घोळवे, मीनाकुमारी सोनवणे,डोळे मॅडम ,पवळ मॅडम ,मोना आहिरे, रेखा गोंदकर, किरण तारपे आदी ग्रामसेवक हजर होते.