गेल्या 24 तासात 1752 रुग्ण आढळले, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजारांवर

0
105

देशात गेल्या 24 तासात 1752 कोरोनाग्रस्त आढळून आले असून आता देशातील रुग्णांचा आकडाल 23452 वर पोहोचला आहे. यातील 17610रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात गेल्या 24 तासात 37 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 724 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासात 491 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 4813 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सध्या आपल्या देशात रुग्णांचा बरे होण्याचा दर 20.5 टक्के असून ही या लढ्यातील सर्वात मोठी सकारात्मक बाब आहे. , असे आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात गेल्या 28 दिवसात 15 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही तर 80 जिल्ह्यात 14 दिवसांत एकही रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा