ग्लोबल न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा पाऊण कोटीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला असून त्यापैकी 37 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आता 50 टक्क्यांहून अधिक म्हणजे 50.10 टक्के झाली आहे.आता जगात सुमारे 33 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत.

कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.62 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 44.28 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, काल (बुधवारी) एका दिवसात तब्बल 1 लाख 34 हजार 705 नव्या रुग्णांची भर पडली, त्याबरोबर तब्बल 1 लाख 31 हजार 298 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. या दोन्ही संख्या आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत.
जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 74 लाख 51 हजार 532 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 18 हजार 872 (5.62 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 33 हजार 379 (50.10 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 32 लाख 99 हजार 281 (44.28 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 32 लाख 45 हजार 470 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 811 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990, कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499
5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529, कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906
6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715, कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177
7 जून – नवे रुग्ण 1 लाख 13 हजार 417, कोरोनामुक्त 48 हजार 619, मृतांची संख्या 3 हजार 385
8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270, कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157
9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071, कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732
10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705, कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

अमेरिकेत कोरोनामुक्तांची संख्या आठ लाखांवर

अमेरिकेत काल (बुधवारी) 982 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 15 हजार 130 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 20 लाख 66 हजार 401 झाली आहे तर 8 लाख 08 हजार 494 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
ब्राझीलमध्ये एका दिवसात 1300 बळी
ब्राझीलमध्ये बुधवारी 1300 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 39 हजार 797 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 75 हजार 184 झाली आहे तर 3 लाख 80 हजार 300 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
पाकिस्तान 15 व्या स्थानावर
पाकिस्तानने बुधवारी सौदी अरेबियाला मागे टाकत जागतिक क्रमवारीतही 15 वे स्थान मिळविले आहे. पाकिस्तानमध्ये 1 लाख 13 हजार 702 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 36 हजार 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तानात अजून 75,139 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना बळींचा आकडा 2,255 वर पोहचला आहे.

बांगलादेशने ओलांडला कोरोना बळींचा एक हजारांचा टप्पा
बांगलादेश कतारला मागे टाकत 19 व्या स्थानावर पोहचला आहे. बांगलादेशने कोरोनाबाधित मृतांचा एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बांगलादेशमध्ये आतापर्यंत 1 हजार 012 कोरोना बळी गेले आहेत. बांगलादेशमध्ये एकूण 74 हजार 865 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 15 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली असून अजून 57 हजार 953 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
मेक्सिकोत बुधवारी 596, भारतात 388, इंग्लंडमध्ये 245, रशियात 216, चिलीत 192 तर पेरूमध्ये 165 कोरोना बळी गेले. पाकिस्तानमध्ये 83, इराणमध्ये 81, स्वीडनमध्ये 78, इटलीत 71, कॅनडात 63 तर कोलंबियात 61 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे.
कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.,

अमेरिका – कोरोनाबाधित 20,66,401 (+20,852), मृत 1,15,130 (+982)
ब्राझील – कोरोनाबाधित 7,75,184 (+33,100), मृत 39,797 (+1,300)
रशिया – कोरोनाबाधित 4,93,657 (+8,404), मृत 6,358 (+216)
यू. के. – कोरोनाबाधित 2,87,399 (+1,003), मृत 41,128 (+245)
स्पेन – कोरोनाबाधित 2,89,360 (+314), मृत 27,136 (+0)
भारत – कोरोनाबाधित 2,87,155 (+12,375) , मृत 8,107 (+388)
इटली – कोरोनाबाधित 2,35,763 (+202), मृत 34,114 (+71)
पेरू – कोरोनाबाधित 2,08,823 (+5,087) , मृत 5,903 (+165)
जर्मनी – कोरोनाबाधित 1,86,866 (+350), मृत 8,844 (+13)
इराण – कोरोनाबाधित 1,77,938 (+2,011), मृत 8,506 (+81)
टर्की – कोरोनाबाधित 1,73,036 (+922), मृत 4,746 (+17)
फ्रान्स – कोरोनाबाधित 1,55,136 (+545), मृत 29,319 (+23)

चिली – कोरोनाबाधित 1,48,496 (+5,737), मृत 2,475 (+192)
मेक्सिको – कोरोनाबाधित 1,24,301 (+4,199), मृत 14,649 (+596)
पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,13,702 (+5,385), मृत 2,255 (+83)
सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,12,288 (+3,717) मृत 819 (+36)
कॅनडा – कोरोनाबाधित 97,125 (+472), मृत 7,960 (+63)
चीन – कोरोनाबाधित 83,046 (+3), मृत 4,634 (0)
बांगलादेश – कोरोनाबाधित 74,865 (+3,190), मृत 1,012 (+37)
कतार – कोरोनाबाधित 73,595 (+1,716), मृत 66 (+4)