गर्भवती हत्तींनीचा मृत्यू, मेनका गांधी संतापल्या वाचा…!

0
285

गर्भवती हत्तींनीचा मृत्यू, मेनका गांधी संतापल्या वाचा…!

ग्लोबल न्यूज- केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला काही माणुसकी नसलेल्या अज्ञान लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. ही घटना उघडकीस आली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार तथा माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला काही लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे सर्व देशभरात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले. “वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.

त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा”, असे मेनका गांधी म्हणाल्या. वृ्त्तसंस्था एएनआयशी पुढे बोलताना, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur