गरजूंच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सरसावले

0
97

गरजूंच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सरसावले
 
कोल्हापूर : कोरोनो विषाणूमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परीस्थित बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) सरसावले आहेत.  

गेले महिनाभरापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेक गरजू नागरिकांची परवड होत आहे. या गरजू नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्याकडून सामाजिक भावना जपत मदत कार्य सुरु आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गेल्या आठवडा भरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यामार्फत शहरात सुमारे १० हजार फुट पॅकेट आणि २ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप* करण्यात आले आहे. आज या मदतीचा चौथा टप्पा शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे पार पडला.

यामध्ये लॉकडाऊनच्या काळातही वार्तांकन करून नागरिकांपर्यत अचूक बातमी पोहचविणाऱ्या गरजू पत्रकार बंधू भगिनी यांना प्रामुख्याने मदतीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील गोरगरीब फेरीवाले, रिक्षाव्यावसायिक, कलाकार* यांच्यासह आज एकूण ५०० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.

यामध्ये तांदूळ दहा किलो, तेल एक किलो, गहू १० किलो, साखर तीन किलो, चहा पावडर १ किलो, तूरडाळ १ किलो आदी कडधान्य आदींचा समावेश होता.  

यासह काल संध्याकाळी सोशल मिडीयावर बिंदू चौक येथील वयोवृद्ध दाम्पत्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी तातडीने माहिती घेवून सौ.लता श्रीकांत घाटगे आणि श्रीकांत घाटगे या वयोवृद्ध दाम्पत्यास महिनाभराच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची* मदत केली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम.राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी, कोरोनाच्या संकटकाळात रोजचे हातावरचे पोट असणारे गोरगरीब गरजू फेरीवाले, रिक्षाव्यावसायिक, बांधकाम मजूर आदिना या लॉकडाऊन स्थितीची झळ बसत आहे. या गरजू नागरिकांना शिवसेना सातत्याने मदत करत करीत आहे. पुढील काळात शहरातील असा कोणताही गरजू व्यक्ती जिवनावश्यक वस्तूपासून वंचित राहणार नाही, याची काळजी शिवसेना घेईल. येणाऱ्या काही दिवसात अनेक टप्प्यात अन्नधान्याची मदत गरजू नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम शिवसेना करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.