खाकी वर्दीतले हिरो : लग्नातला खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले १ लाख

0
590

खाकी वर्दीतले हिरो :

लग्नातला खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले १ लाख

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांचा दिलदारपणा

सोलापूर : करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रवीण धर्माजी साने यांनी माणुसकीचे दर्शन घडविले अाहे. आपले लग्न साधेपणाने करून लग्नातला वायफळ खर्च टाळत मुख्यमंत्री सहायता मदत निधीस १ लाखाची मदत देत एक वेगळा अादर्श ठेवला आहे. त्यांच्या दिलदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाळगाव चिखली तालुका हवेली धर्माजी सोपान साने यांचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यांचा विवाह विलास बबन गाढवे राहणार आर्वी तालुका जुन्नर यांची कन्या स्नेहल यांचा विवाह २७ मे रोजी पिंपरी चिंचवड येथे अायोजीत केला होता. आपल्या मुलांचा विवाह थाटामाटात पार पाडवा अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा होती.

लॉकडाऊनमुळे अत्यंत साधेपणाने व आदर्श पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाने घेतला. कुठलाही बडेजाव न करता हा विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आर्वी येथे सामाजिक अंतर ठेवत पार पडला. वधू-वरासह सर्वांनी तोंडाला मास्क बांधून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रेषीमगाठी बांधल्या. लग्नात नवंदांपत्य यांनी एकमेकांना मास्क व सॅनिटायजझर भेट दिले.

कोरोनाच्या संकटात जनसामान्यांची होत असलेली परवड लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता मदत देण्याचे ठरविले. या नवदाम्पत्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द करत विवाह सोहळा अविस्मरणीय केला.

सामाजिक बांधिलकी म्हणून केली मदत

कर्तव्याला महत्त्व देत करमाळा येथे ४५ दिवस लॉकडाऊनमध्ये सेवा बजावली आणि त्यानंतर विवाह केला आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांसाठी सरकार आपल्या परीने मदत करत आहे. या मदतीत आपलाही वाटा असावा या हेतूने सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही एक लाख रुपयांची मदत केली, असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here