
ग्लोबल न्युज : कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रोज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका करणारे भाजपाचे डझनभर नेते सध्या मोठ्या प्रमाणात जनतेकडून ट्रोल होत आहे.
सर्व प्रकारच्या Software, Website, Mobile App, Digital Marketing साठी संपर्क 9890093759
कालच घटकोपरचे आमदार राम कदम यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला परंतु संवाद साधण्यापूर्वी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सायबर सेलची धमकीच त्यांनी दिली होती तरीही राम कदमांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले होते शेवटी नाइलाजाने कदमांना ती पोस्ट डिलिट करावी लागली होती.
अशातच देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्या सारख्या बड्या भाजपा नेत्यांनी खासदार, आमदार, नगरसेवक यांनी पंतप्रधान फंडात पैसे जमा केल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते तसेच याच फंडात जमा करण्याचे आवाहन केले होते मात्र नेटकऱ्यांनी या सर्वच नेत्यांना चांगलेच झोडपले होते. “खाता महाराष्ट्राच आणि गुणगान गाता दिल्लीच” आशा कमेंट लिहत नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती
आज देशावर नाही तर राज्यावर कोसळलेल्या कोरोनाच्या संकटाशी शासनाने आणि विरोधी पक्षाने मिळून सामना करायची वेळ असताना सुद्धा भाजपानेते सरकारवर टीका करत राजकीय पोळी भाजत आहे हीच गोष्ट आजच्या राज्यातील जनतेला पचनी पडलेली नाही. पण ” आम्ही केले तर पुण्य आणि तुम्ही केले तर पाप” असच काहीश्या मनस्थितीत भाजपचे नेते वागताना दिसत आहे. मात्र जनता सर्वच जाणत असते हे आज भाजपा नेते विसरलेले दिसून येत आहे.
