कोरोना व्हायरस: बार्शीत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने सार्वजनिक ठिकाणी लावली प्रबोधनात्मक पत्रके

  0
  26

  बार्शी: बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करोना विषाणू संसर्गापासून घ्यावयाची काळजी या विषयीचे जाहिरात पत्रके बार्शीतील सार्वजनिक ठिकाणी लावून प्रबोधन करण्याचे काम केले.


  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  शहरातील सर्व औषध दुकानात तसेच रुग्णालयात व बस स्थानक ,मंदिर,मशीद आदी सार्वजनिक  ठिकाणी लावण्यात आली.तसेच करोना विषाणू गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य असल्याने पसरतो त्या मुळे महिला दिना निमित्त १५ मार्च रोजी जे कार्यक्रम आयोजीत केले होते ते रद्द करण्यात आलेले आहेत असे बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी जाहीर केले.

   हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजीत गाढवे, सचिव मोईझ काझी, उपाध्यक्ष हेमंत गांधी ,कोशाध्यक्ष गणेश बारसकर, रेशमा बागवान,नितीन मोरे,अविनाश तोडकारी,प्रशांत चाकवते यांनी कष्ट घेतले.