कोरोना विरुद्धच्या लढ्यात महराष्ट्राला केरळ राज्याची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

0
161

कोरोना विरुद्धच्या लढ्यात महराष्ट्राला केरळ राज्याची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

ग्लोबल न्युज : सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त झालेल्या केरळ राज्याचे आरोग्य मंत्री के. शैलजा यांच्याशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधत सविस्तरपणे चर्चा केली होती. याच पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी केरळ राज्यातील आरोग्य यंत्रनेची मदत घेण्याचे महराष्ट्र सरकारने ठरविले होते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळ शासनाने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाविरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होईल. केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी दिली आहे.

कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या केरळमधील डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात केरळ सरकारकडे करण्यात आली होती. केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही व्हावा, अशा सरकारचा मानस आहे.