कोरोना योद्धा : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटतोय हा आरोग्य सभापती …वाचा काय काय केले ते

0
190

वडाळाकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटतोय कोरोना योद्धा आरोग्य सभापती अमेय घोले ..वाचा काय काय केले ते

वरळी पॅटर्न सर्व मुंबईत आला असून त्यात आरोग्य विभाग, मनपा व नगरसेवक तथा आरोग्य समिती सभापती अमेय घोले यांना मोठे यश आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मेडिकल सुविधा व कोरोना संदर्भात उत्तम पाठपुरवठा केला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज अमेय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गांव येथे स्थानिक मंडळे व प्रशासन यांचा समतोल राखून नागरिकांसाठी फेवर स्क्रींनिग क्लीनिक आयोजित करण्यात आले होते. तेथे नागरिकांची चाचणी करण्यात येत असून त्या प्रसंगी सायन आणि के.इ.एम रुग्णालय येथील डॉक्टर आणि आरोग्य सेविका तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तब्बल ५ दिवसात २१००० हजार लोकांची स्क्रिनिंग पूर्ण करून त्यातील ८६ लोकांना विलगिकरण करण्यात आले आहे. त्यातील १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. बीएसटी आणि बीएमसी वसाहत मिळून एकूण २२ टेस्टिंग कॅम्प चालू करण्यात आले होते. महापौर किशोरीताई पेडणेकर आणि आरोग्य सभापती अमेय घोले यांनी कोरोना रुग्णाची कशा प्रकारे काळजी घेण्यात येत आहे याची पाहणी करण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल येथे अचानक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. आपल्या विभागातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून घोले यांनी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप घरोघरी केले होते.

आज प्रभागात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच CEAT TYAR LTD व RPG GROUP यांच्या संयुक्त विद्यमाने टेस्टिंग बुथचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच रुग्नांसाठी माटुंगा येथील मनपा शाळेत १०० खाटांची सुविधा सुरू करण्यात आली होती. आज प्रभागात प्रत्येक मंडळांना
स्व-तपासणी किट देण्यात आले व मंडळांचे कार्यकर्ते स्वतःची जबाबदारी घेऊन विभागात लोकांची तपासणी करत होते. आज आपल्या नगरसेवक निधीतून १० लाख रुपये तसेच सीएसआर फंडातून ३० लाख रुपये खर्च केले आहेत.

आज सीएसआर फंडाच्या माध्यमातून मुंबई मनपा तर्फे पोलिसांना फेसशिल्डचे वाटप करण्यात आले तसेच १२००० सॅनिटीझरचे वाटप करण्यात आले असून स्वखर्चातून मनपा कर्मचाऱ्यांना व्हिटामिन सी आणि डी-हायड्रेशनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. तसेच सलमान खान यांच्या बीइंग ह्यूमन आणि अमेय घोले यांच्या संयुक्त विघमाने दामोदर हॉल, शिवाजी मंदिर, दीनानाथ मंगेशकर येथील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य पुरवण्यात आले होते. तसेच गराजवंतांना अन्नधान्याचे वाटप अमेय घोले यांच्या माध्यमातून होता आहे. अजूनही घोले यांचे कार्य विभागात चालूच आहे.