कोरोना युद्ध आपणच जिंकणार ! देशात गेल्या 24 तासात 1074 रुग्णांची कोरोनावर मात

0
144

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात एक हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारीपासून आणखी 17 मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. लॉकडाऊन वाढविण्याबरोबरच नवीन मार्गदर्शक सूचना देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की देशभरात काही उपक्रमांवर बंदी घातली जाईल.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आरोग्य मंत्रालयाने गृह मंत्रालयाशी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की देशात एकूण 42533 कोरोना रुग्ण आहेत, त्यापैकी 29,453 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाची 2553 प्रकरणे वाढली आहेत. मात्र असं असलं तरी याच कालावधीत 1,074 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 706 वर पोहचली आहे. यामुळं कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट 27.52 वर पोहचला आहे.