कोरोनावर लस विकसित करण्यासाठी पुण्यात 20 माकडांवर प्रयोग

0
146

कोरोनावर लस विकसित करण्यासाठी पुण्यात 20 माकडांवर प्रयोग

सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना रुग्नाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लास विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल.यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.