कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारले खांडवीच्या जिजाऊ गुरुकुल ने देणार निवासी मोफत शिक्षण

0
180

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारले खांडवीच्या जिजाऊ गुरुकुल ने देणार निवासी मोफत शिक्षण

बार्शी : अनेक दिवस झाले देशात आणि जगात कोरोनाने थैमान घातले आहे. या काळात ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी मोठं मोठया हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेतले पण एकीकडे कोरोनामुळे कित्येक दिवस झाले काम नाही म्हणून उपासमारीची वेळ आली आणि अशा परिस्थितीत त्या महाराष्ट्रातील कित्येक गरीब लोक केवळ वेळेत उचपार न मिळाल्याने आणि पैशाच्या अभावी मरण पावले. पण त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले घरातील कर्ता माणूसच जर गेला तर त्या कुटुंबाकडे कोण पाहणार त्यांच्या मुलांचे भविष्य आणि शिक्षणाचे काय…. म्हणून महाराष्ट्रातील कोरोना मूळे मरण पावलेल्या घरातील मुलांची निवासी शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ गुरुकुल खांडवी ता बार्शी या संस्थेने घेतली आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यामध्ये इ 8 वी ते 12 (कॉमर्स /सायन्स) मधील विद्यार्थ्यांना (हॉस्टेल मेस कॉलेज व शाळा) हे सर्व मोफत मध्ये मिळणार आहे तसेच जी मुले पोलीस व आर्मी भरती करत असतील पण आई व वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा भरती होइपर्यंत चा संपूर्ण खर्च मोफत केला जाणार आहे .जिजाऊ गुरुकुल खांडवी ही संस्था गेली 11 वर्ष झाली शिक्षण क्षेत्रात काम करत आहे .या संस्थेमध्ये मुलाना निवासी सैनिकी पटर्न पध्दतीने पूर्ण शिक्षण दिले जाते मुलांच्या निवास,भोजन, कॉलेज व शाळा आणि प्रशस्त क्रीडांगण हे उपलब्ध आहे .

आपण ही समाजासाठी काही तरी देणं लागतो हा प्रामाणिक उद्देश ठेऊन समाजातील आशा मुलाना शिक्षण देऊन त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणुन हा उपक्रम सुरू केला .आपल्या आजूबाजूला गावात कुठेही आईवडील नसतील किंवा अत्यंत परिस्थिती हालाकीची आहे असे मुलं असतील तर आपण जिजाऊ गुरुकुल खांडवी ता बार्शी जि सोलापूर या ठिकाणी संपर्क करावा असे नम्र आवाहन संस्थेचे अद्यक्ष संभाजी घाडगे यांनी केले आहे

संपर्क 8830949306

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here