कोरोनानंतर पुन्हा जगावर येणार संकट, नासाने दिला इशारा…!

0
290

सुरज गायकवाड

कोरोनानंतर पुन्हा जगावर येणार संकट, नासाने दिला इशारा…!

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला असताना येणाऱ्या 6 तारखेला जगावर आणखी एक संकट येणार आहे. याची माहिती नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे.

पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारी एकी एक लघुग्रह म्हणजेच अ‍ॅस्टेरॉईड पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था नासाने दिला आहे. जून महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या लघुग्रहाचे नाव ‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ असं असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

सहा जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून त्याचा व्यास २५० ते ५७० मीटर इतका असल्याचे नासाने म्हटले आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून ५.१ दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ११.१० किमी प्रती सेकंद इतका असल्याची शक्यता अमेरिकेमधील काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) १२ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजून १७ मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur