कोरोनानंतर आता चक्रीवादळ; सुरुवातीलाच इतक्या संकटात कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नसेल!

0
289

असा’ मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल, ठाकरेंवर अर्षद वारसीने केला कौतुकाचा वर्षाव

मुंबई – एका बाजूला कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्र हैराण झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आता निसर्ग या चक्रीवादळाने मुंबईकडे कूच केल्याचं दिसत आहे. अश्या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अतिशय धीराने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अभिनेता अर्षद वारसीने कौतुकाचा वर्षाव केला आहे.आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या मोठ्या संकटांना मुख्यमंत्र्यांन तोंड द्यावं लागतंय, असे अभिनेता अर्षद वारसीनं म्हटलंय.

उद्धव ठाकरेंच्या याच संकटाशी सामना करण्याच्या प्रयत्नाचं अभिनेता अर्षद वारसीने कौतुक केलंय.मुन्नाभाई एमबीबीएसमधील सर्किट म्हणजे अर्षद वारसीने ट्विट करुन उद्धव ठाकरेंना येणाऱ्या संकटांबाबत भाष्य केलं आहे. मला वाटत नाही, दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यांनी नुकताच आपल्या खुर्चीचा पदभार घेतला अन् जागितक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला.

मुंबई सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना अन् आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना या मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur