कोरोनाच्या लढाईत खारीचा वाटा :कु मुक्ताईच्या वाढदिवसानिमित्त सीएम फंडाला 11 हजारांची मदत

0
294

कोरोनाच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून कु मुक्ताई हिच्या 4 चौथ्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई गारमेंट्सच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 हजार 4 रुपयांचा धनादेश

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांच्याकडे यांनी सुपूर्द केला धनादेश

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ठाणे : कोरोनाच्या लढाईविरोधात खारीचा वाटा म्हणून मुलगी कु.मुक्ताई हिच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्ताई गारमेंट्स, करमाळाच्या वतीने संचालक मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 हजार 4 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना एकनाथजी शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यापूर्वी, गेल्या महिन्यात मंगेश चिवटे यांचे वडील तथा मुक्ताई गारमेंट्सचे प्रोपायटर श्री नरसिंह मनोहरपंत चिवटे यांनीदेखील 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 हजार 80 रुपयांचा धनादेश करमाळा तहसीलदार श्री माने साहेब यांच्याकडे सुपूर्द केला होता. श्री नरसिंह चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य असून महाराष्ट्र राज्य खते – बी बियाणे संघटनेचे माजी उपाध्यक्ष आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur