केंद्राची प्रतीमा मालिन करण्याचे कारस्थान चालू आहे – देवेंद्र फडणवीस

0
291

केंद्राची प्रतीमा मालिन करण्याचे कारस्थान चालू आहे – देवेंद्र फडणवीस

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. महाराष्ट्रात खोटा प्रचार केला जात असून अन्यायाचं वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने मदत होत असल्याचं फडणवीसांनी सांगितले.

केंद्राकडून गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्राने 4 हजार 592 कोटींचं धान्य दिले तसेच मजूर छावण्यांसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. उज्वला योजने अंतर्गत एक हजार 625 कोटी रुपये किंमतीचे सिलेंडर मोफत देण्यात आले. 600 श्रमिक रेल्वे सोडल्या, एका रेल्वेचा खर्च 50 लाख रुपये आहे, श्रमिक रेल्वेसाठी जवळपास 300 कोटी दिले आहेत. केंद्राने 28 हजार 104 कोटींची मदत राज्याला केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

शेतमालसाठी केंद्राने 9069 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. पीपीई कीट, मास्क, रेशन, प्रवासी मजूरांचा खर्च, शेतमाल खरेदी खर्च, कापूस खरेदीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी केंद्राकडून मदत होत आहे. जीएसटीसंदर्भात मनात येतील ते आकडे दिले जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur