केंद्राकडून पुन्हा एकदा राज्य सरकारसोबत दुजाभाव…

0
48

मुंबई : कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सर्वच स्थरातून मदतीचा ओघ येत आहे. परंतु पुन्हा एकदा केंद्राने राज्य शासनाबरोबत दुजाभाव केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आलेला फंड कंपन्यांच्या कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआर खर्चात ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अर्थात दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या ‘पीएम केअर्स’साठी दिलेल्या योगदानास मात्र सीएसआर खर्च म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

आता कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय तर देशावर येणाऱ्या संकटावेळी आर्थिक मदत पुरवणाऱ्या कंपन्यांना आयकर विभागाकडून सूट देण्यात येते. परंतु केंद्राच्या या धोरणामुळे मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले योगदान सीएसआर निधीतून अपात्र ठरवण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मात्र आता केंद्राच्या या तरतुदीमुळे देशातील कंपन्यांचा सीएसआर निधीतील पैसा मोठ्या प्रमाणावर पीएम केअर्समध्ये योगदानासाठी वळण्याची शक्यता असून मुख्यमंत्री सहायता निधी किंवा राज्यांच्या कोविड १९ सहायता निधीला सीएसआर निधीतून पैसा मिळणार नाही, अशी व्यवस्थाच आता केंद्र सरकारने करून ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.