कृष्णआणि महाभारत
रणनीती भाग ०१
कौरव पांडव युद्ध होणार ही काळ्या दगडावरची रेघ झाली होती. दोन्हीकडील महारथी आपले सैन्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते.कोणी कपटाने तर कोणी मैत्रीने.हळू हळू सैन्य जमवत असताना दोघांच्या ही डोक्यात एकच वेळी विचार चमकला ‘यादव सैन्य’ कोणाच्या बाजूने लढणार?

बलराम म्हणजे साक्षात शेषाचा अवतार महान योद्धा गदायुद्धात त्याचा हात धरणारा कोणीच नाही त्याचा लाडका शिष्य म्हणजे दुर्योधन.दुसरीकडे कृष्ण म्हणजे साक्षात भगवंत त्याचा ओढा पांडवांकडे.
कौरव सैन्याच्या बाजूने दुर्योधनाने ही कामगिरी स्वीकारली तर पांडवांच्या बाजूने अर्जुनाने.दोघेही बलरामाकडे गेले आणि बलरामाने याचे अधिकार आधीच कृष्णाला दिले होते.आता कृष्णाकडे मागावे लागेल म्हणून दुर्योधन आधीच चिडला होता कारण कृष्ण साधा नाही याची खात्री दुर्योधनाला होती…
अर्जुन? तो मात्र खुश होता त्याचे काम अधिक सोपे झाले होते. मित्राकडून मागण्यात कसला संकोच?
दोघेही कृष्णाच्या महालात पोचले बघतात तो काय कृष्ण आपला महालात झोपलेला.अर्जुनाने आणि दुर्योधनाने वाट बघायचे ठरवले.अर्जुन भक्ताप्रमाणे पायाशी बसला तर दुर्योधन डोक्याशी.
श्रीकृष्ण काही वेळाने उठले.शेवटी भगवंत असल्याने कोण का आले आहे याची जाणीव त्यांना आधीच झाली होती पण ते यांच्या तोंडून ऐकावे या हेतूने त्यांनी आपल्या मोहक शैलीत विचारले…..”काय झाले तुम्हा दोघांना? इथे असे का आलात?”
दुर्योधन आवेशात श्रीकृष्णांना सर्व सांगू लागला आणि यादव सेनेची मागणी त्याने केली.श्रीकृष्णांनी अर्जुनाला एकवेळ न्याहाळले आणि छोटे पण मोहक हास्य देऊन बोलायला सुरुवात केली.
“हे बघा यादवांचे संबंध दोन्ही पक्षांशी चांगले आहेत त्यामुळे तुमच्यातील एकाची निवड करणे म्हणजे दुसऱ्यावर अन्याय आहे.त्यामुळे यादव सेना या युद्धात उतरणार नाही हे नक्की पण……”
(इथे श्रीकृष्णाने बलराम आणि स्वतःच्या शक्तीच्या मुळे होणाऱ्या संहाराला यशस्वी पणे थांबवले होते पण खरी परीक्षा तर पुढे होती)”अस म्हणतात की मागायला आलेल्या माणसाला रिकाम्या हाताने पाठवू नये म्हणुन मी तुम्हाला नक्की काहीतरी देणार आहे”
भगवान श्रीकृष्ण जाणून होते की न लढता सुद्धा आपल्याला या युध्दाचा भाग व्हावे लागणार आहे हीच त्यांनी स्वतःसाठी बनवलेली नियती आहे पण….
त्या साठी ज्या पक्षात धर्म आहे तिथेच जावे लागेल…
पण मग दुसऱ्या पक्षाला असे काही प्रलोभन द्यावे लागेल की जेणेकरून त्यांनी आपल्याला निवडायला नकोच…..

महाभारतात युध्दातील कृष्णाचा हा पहिला ब्रेन गेम होता.
“तुलना”बराच वेळ असलेल्या शंतीला भंग करत श्रीकृष्ण म्हणाले.”तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे माझी नारायणी सेना मी तुमच्यात एकाला देतो आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः” ” एकटा,निशस्त्र आणि फक्त रथाचा सारथी बनून राहीन”
हे शब्द खूप खूप महत्त्वाचे होते याने दृश्य स्वरूपात नारायणी सेनेचे पारडे जड केले होते.एका बाजूला महाशक्ती असलेली दैवी सेना आणि एका बाजूला एक योद्धा तो फक्त सारथी बनून राहणार.थोडक्यात म्हणजे तुलना करण्याइतके काही नाहीदोघांना काय हवे ते सांगा.आता दोघांच्या मध्ये कोण पहिले मागणार हा वाद सुरू झाला.
श्रीकृष्णाने मनातल्या मनात ठरवले होतेच की काहीही करून दुर्योधनाच्या बाजूने आपल्याला जायचे नाही.
कृष्णाने च तोडगा सांगितला. अस म्हणतात की ज्याला गरज आहे म्हणजे जो याचक आहे तो नेहमी ज्याच्याकडे मागतोय त्याच्या पायाशी बसतो.थोडक्यात अर्जुनाला जास्त गरज दिसते…
त्यामुळे अर्जुना माझ्या मित्रा सांग तुला काय हवं आहे?
(इथे श्रीकृष्णाने दुर्योधनाला दाखवून दिले होते की गरज असलेल्या व्यक्तीला त्या प्रमाणे व्यवहार सुद्धा करता आला पाहिजे) दुर्योधन आता विचार करू लागला होता.त्याला भीती होती की अर्जुनाने नारायणी सेना मागितली तर?बिन कामाचा कृष्ण आपल्या गळ्यात पडणार…..
अर्जुनाने एक क्षण विचार केला आणि नम्रतेने कृष्णाला म्हणाला “हे वासुदेवा मला तू हवा आहेस कारण सैन्य किती ही असेल तरी जो वर ते सांभाळायची शक्ती असलेला माणूस नेतृत्व करत नाही त्या सैन्याचा काही उपयोग नसतो..”
(इथे खरी तुलना ही १००किलो लोखंड आणि एका गारगोटी मध्ये होती पण म्हणतात ना कोणती गारगोटी हिरा आहे हे फक्त कसब असलेला मनुष्य सांगू शकतो तसच देवाच अस्तित्व सुद्धा खरा भक्त च जाणू शकतो)
दुर्योधन आपल्या विजयाने अर्जूनावर कुत्सित हसला आणि श्रीकृष्णा कडे बघून अर्जुन मनमोकळ हसला होता.
अर्जुन आणि दुर्योधन दोघेही आपल्या स्थानी निघून गेले…
या लढाई मध्ये दोघांचा विजय झाला होता.
दुर्योधनाला शक्ती मिळाली होती आणि अर्जुनाला शक्तीच रहस्य…या एका निर्णयाने महाभारताचा निकाल बदलणार होता कारण कृष्णाच्या ब्रेन गेम ने अचूक नेम साधला होता
क्रमशः
©Yash Oak