काळजी वाढली ! औरंगाबादेत आणखी आठ जणांना कोरोनाची लागण एकूण आकडा 282 वर

0
27

औरंगाबाद | शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज परत एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत 8 रुग्णांची वाढ झाली आहे. सतत होत असलेल्या रुग्णांच्या वाढीमुळं औरंगाबादकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. नव्याने आढळून आलेले आठ रुग्ण गुलाब वाडी, भीमनगर, संजयनगर, मुकुंदवाडीमधील असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळीच शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 17 रुग्णांची भर पडली होती. आणि आता परत एकदा कोरोनाचे 8 नवीन रुग्ण आढळून आल्यानं औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूणच आकडा 282 वर गेला आहे. तसेच आतापर्यंत 25 रुग्ण या आजारातून बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा