काँग्रेसचे नेते शिवलिंग सुकळे यांचे निधन

0
138

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नेते शिवलिंग सुकळे यांचे आज बुधवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षातून विविध नेत्यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.एक अभ्यासू आणि निष्ठावंत नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शिवलिंग सुकळे हे करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती .सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यांना किडनीचा त्रास होता तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना एका खाजगी दवाखान्यात डायलेसिस साठी ऍडमिट करण्यात आले होते.आज बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भटक्या विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.