एक नजर सकाळच्या हेडलाईनवर…!

0
151

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

‼️ग्लोबल न्यूज मराठी सुपरफास्ट हेडलाईन्स‼️


✍????वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ, दुधनी.


????घरीच रहा…. सुरक्षित रहा…!


कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा…..


????????
????नवी दिल्ली : कृषी क्षेत्रासाठी हवामान खात्याने दिला आनंदाची बातमी. नैऋत्य मान्सून अंदमानच्या सीमेवर दाखल.

????????
????नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लॉकडाउनमध्ये ३१ मे २०२० पर्यंत वाढ. लॉकडाउच्या चौथ्या टप्प्यात धार्मिक स्थळे, रेल्वे, मेट्रो, हॉटेल्स, मॉल्स, विमानसेवा, शाळा- कॉलेज राहणार बंद. राजकिय कार्यक्रमांवरील बंदी कायम. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली केली जाहीर.

????????
????नवी दिल्ली: देशात कोरोना ग्रस्तांची संख्या ९० हजारांच्या घरात. गाव गाड्यांवरही कोरोनाचे प्रवेश झाल्याने परिस्थिती चिंताजनक. तब्बल ५० टक्के कोरोनाबाधीत मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, आणि पुणे या ५ शहरांमधील

????????
????नवी दिल्ली : २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील घोषणा जाहीर. आर्थिक पॅकेजमध्ये जमीन, कामगार, कायदा, लिक्विडिटीवर भर. आरोग्यावर खर्च वाढवला जाणार. शिक्षणक्षेत्रातही होणार आमुलाग्र बदल.

????????
????नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये राज्यांसाठी तरतूद. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यांसाठी मोठी घोषणा. २०२०-२१ मध्ये राज्ये जीडीपीच्या पाच टक्के कर्ज घेऊ शकणार. कर्ज ०.५० टक्क्यांनी वाढवण्यासाठी कोणतीही अट असणार नाही.

https://www.facebook.com/groups/651623832297144/

????????
????नवी दिल्ली : मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद. घरी परतलेल्या मजुरांच्या हाताला मिळणार काम. रोजगारासाठी केंद्रांना उपाययोजना हाती घेतल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती.

????????
????नवी दिल्ली : शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळाच चॅनल तयार करण्यात येणार. सध्या ३ चॅनल्स असून यामध्ये आणखी १२ चॅनल्सची भर पडणार. इंटरनेटचा अभाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार फायदा.

????????
????नवी दिल्ली : करांचे वितरणातील ४६ हजार ३८ कोटी रुपये राज्यांना अदा. कोरोनासाठी ४ हजार ११३ कोटी रुपयांची आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना मदत अर्थमंत्र्यांनी दिली माहिती.

????????
????मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या झाली ३३ हजार ५३. आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण झाले बरे. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री राजेश टोपे.

????????
????मुंबई : राज्यात सलग चौथ्यांदा ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढला. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी. केंद्राची नियमावली आल्यानंतर राज्याची नियमावली जाहीर होणार.

????????
????मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ हजारांवर. सलग तीन दिवस दीड हजाराच्या पुढे रुग्ण सापडल्याने संकट अधिकच गडद. पुणे, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर येथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढले.

????????
????मुंबई : राज्यात उद्योग टप्प्या- टप्प्याने सुरु करण्यात येणार. कंटेंन्मेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंध शिथिल होऊन आणखी मोकळीक मिळण्याची शक्यता.

????????
????सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ३१ मे पर्यंत संचार बंदी कायम. सरकारी कार्यालये सुरू. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले नवे आदेश. नव्या आदेशानुसार महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मंगल कार्यालये बंदच राहणार. प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश. नागरिकांना ई-मेलवर तक्रारी दाखल करता येतील.

????????
????सोलापूर : सोलापूरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत २१ने वाढ. सोलापूरातील एकूण रुग्णांची संख्या झाली ३८५. तर मृतांची संख्या २ ने वाढून झाली २६.

????????
????सोलापूर : रविवारी २७९ जणांचे अहवाल प्राप्त. प्राप्त अहवाल पैकी २५८ निगेटिव्ह तर २१ पॉझिटिव्ह. यामध्ये १२ पुरूष आणि ९ स्त्रियांचा समावेश.

????????
????सोलापूर : रविवारी रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या ८. तर केगांव इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटरमधून १९८ जणांना सोडले घरी. सोलापूरात आतापर्यंत एकूण १५८ जणं बरे होऊन घरी परतले.

????????
????सोलापूर : आत्तापर्यंत एकूण ४२८२ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील ४०९९ जणांचे अहवाल प्राप्त. प्राप्त अहवालापैकी ३७१४ निगेटिव्ह तर ३८५ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

????????
????सोलापूर : सोलापूर शहरामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढत जाणारे कंटेंन्मेंट झोनवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर. मेडिकल सर्टिफिकेटसाठी एकाच हॉस्पिटलमध्ये गर्दी न करता ज्या-ज्या ठिकाणी सोय केली आहे त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट घेण्याचे महापालिका प्रशासनाने केले आवाहन.

????????
????सोलापूर : महापालिकेच्यावतीने सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उभारण्यात आलेल्या कोरंटाईन सेंटरला शिवसेना शहर प्रमुख गुरुषांत धुत्तरगांव आणि शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिली भेट. कोरंटाईन सेन्टरमध्ये पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यावरून व्यक्त केली नाराजी.

????????
????सोलापूर : १ हजार १४६ परप्रांतीय मजुरांना घेऊन सोलापूरातुन विशेष रेल्वे ग्वालियरकडे रवाना. ट्रेन निघण्यापूर्वी फ्लॅफॉर्मवर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली सर्व श्रमिकांची आरोग्य तपासणी.

????????
????सोलापूर : नीलम नगर येथील लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार. ४० रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. रुग्णांची स्वॅब घेण्याची सोयही केली जाणार. पालिका आयुक्त दीपक तावरे आणि पालिका आरोग्य पथकाने केली पाहणी.

????????
????सोलापूर : पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली विभागीय कार्यालय क्रमांक ४,५ व ७ येथील प्रतिबंधित क्षेत्राना भेट. कंटेंन्मेंट झोनमध्ये दररोज फवारणी करण्याबाबत मुख्यआरोग्य निरीक्षकांना आयुक्तांनी दिल्या सूचना.

????????
????सोलापूर : दिल्लीमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे इतर जिल्ह्यातील १३४५ विद्यार्थी आपापल्या मूळगावी परतणार. यामध्ये सोलापुरामधील ६८ विद्यार्थी विशेष रेल्वेने आज सोलापूरात येणार.

????????
????सोलापूर : प्रतिबंधीत क्षेत्र वगळता अन्यत्र ऑनलाईन मद्य विक्रीसाठी परवानगी दिल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी इलेक्ट्रॉनिक व्यवसाईकांना परवानगी द्या – सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

????????
????पंढरपूर : भामरागड तालुक्यातील पारयकोटी-कोरपरशी गावात जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूर तालुक्यातील पळूजचे सुपुत्र क्यूआरटी पथकाचे उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने शहीद. पंढरपूर तालुक्यावर पसरली शोककळा.