एका दिवसात 729 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 9,318, मृतांचा आकडा 400 वर!

0
31

ग्लोबल न्यूज – राज्यात काल (मंगळवारी) कोरोनाच्या 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9,318 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात काल 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात 25 जण मुंबईचे तर पुण्यातील दोघे तर जळगाव येथील चौघांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा वाढून 400 मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल 106 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.

राज्यातील कालच्या कोरोनाबाधितांमध्ये 16 पुरूष तर 15 महिला आहेत. त्यातील 20 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 10 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 20 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात आतापर्यंत पाठविलेल्या 1 लाख 29 हजार 931 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 136 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटीव्ह आले आहेत; तर 9318 जण पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 55 हजार 170 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 9917 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1388 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई महानगरपालिका- 6169 (मृत्यू 244)

ठाणे- 45 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 344 (मृत्यू 4)

नवी मुंबई मनपा- 142(मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली- 153 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा – 3

भिवंडी, निजामपूर – 14

मिरा-भाईंदर- 123 (मृत्यू 2)

पालघर- 41 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 123(मृत्यू 3)

रायगड- 22

पनवेल- 44 (मृत्यू 1)

नाशिक – 5

नाशिक मनपा- 19

मालेगाव मनपा – 171 (मृत्यू 12)

अहमदनगर- 26 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा – 16

धुळे – 8 (मृत्यू 2)

धुळे मनपा – 17 (मृत्यू 1)

जळगाव- 30 (मृत्यू 8)

जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1)

नंदुरबार – 11 (मृत्यू 1)

पुणे- 58 (मृत्यू 3)

पुणे मनपा- 1044 (मृत्यू 76)

पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)

सातारा- 32 (मृत्यू 2)

सोलापूर- 7

सोलापूर मनपा- 75 (मृत्यू 5)

कोल्हापूर- 7

कोल्हापूर मनपा- 5

सांगली- 26

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 1

रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)

औरंगाबाद -1

औरंगाबाद मनपा- 89 (मृत्यू 6)

जालना- 2

हिंगोली- 15

परभणी मनपा- 1

लातूर -12 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-3

बीड – 1

नांदेड मनपा – 3

अकोला – 12 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 22

अमरावती- 2

अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7)

यवतमाळ- 71

बुलढाणा – 21 (मृत्यू 1)

वाशिम – 1

नागपूर- 4

नागपूर मनपा – 131 (मृत्यू 1)

भंडारा – 1

चंद्रपूर मनपा – 2

गोंदिया – 1

राज्यातील रुग्णांचे समूह सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 664 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9061 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. त्यांनी एकूण 38.30 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.