उस्मानाबाद: आज दि.१६ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ५३ स्वेब नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय महाविद्यालय, लातूर तेथे पाठविण्यात आले होते.

सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्यापैकी ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ४ अनिर्णीत असून ४५ जणांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : एक रुग्ण हा वाणेवाडी ता. उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. एक पेशंट सलगरा ता. तुळजापूर येथील आहे. एक पेशंट मसला ता. तुळजापूर येथील असून तो दोन दिवसापूर्वी पॉसिटीव्ह पेशंट चा सहप्रवासी आहे. एक पेशंट बेटजवळगा ता उमरगा येथील असून तो दहा दिवसापूर्वी मुंबई वरून आला आहे.


Total cases 153.
Discharge 116.
Death 6.
Active cases 31.
साभार/ उस्मानाबाद माझा